मुंबई नाशिक जिल्ह्यातील नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एरंडगाव-रायते गावाजवळ बुधवारी पहाटे कार पलटी होऊन तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, आज सकाळी चालकासह ७ जण एका कारमधून गुजरातच्या सुरत येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. कार नाशिक जिल्ह्यातील येवला येथे येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून तीन वेळा उलटली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येवला तहसील पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
