मुंबई मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील भगतसिंग नगर येथे शनिवारी पहाटे एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.
या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, भगतसिंग नगर भागात आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. वडील आपल्या दोन मुलांसह घरी झोपले होते, तर पत्नी रात्रीच्या शिफ्टमध्ये कामावर गेली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघांनाही तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. संजोग पावसकर (४८), त्यांची मुलगी हर्षदा पावसकर (१९) आणि मुलगा कुशल पावसकर (१२) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.
