मुंबई काल रात्री चार बांगला गुरुद्वारा साहिब येथे आयोजित भव्य नगर कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिभावाने व आनंदाने भरून गेला. लोखंडवाला बॅक रोडपासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप गुरुद्वारात “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह” च्या जयघोषात झाला, ज्यामध्ये पाच हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. वाटेत ठिकठिकाणी सेवा स्टॉल उभारण्यात आले होते, जिथे पाणी, चहा, प्रसादाची सोय होती.
गुरुद्वाराला 500 किलो फुलांनी सजवण्यात आले असून निहंग शिखांच्या गतका कलेने भाविकांना मंत्रमुग्ध केले. नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी आणि शेवटी लंगर सेवेने कार्यक्रम संस्मरणीय झाला. सरदार जसपाल सिंग सुरी आणि मनिंदर सिंग सुरी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेले हे नगर कीर्तन संपूर्ण समाजात प्रेम, समता आणि सेवेचा संदेश देणारे गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वाला समर्पित होते.