मुंबई महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात असलेल्या मुरार गावातील एका अल्पभूधारक कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेने नांदेडच्या मुदखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी गुरूवारी सकाळी चारही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंथले यांनी सांगितले की, “आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले आणि मुलांनी रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली.
या घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल.” बजरंग रमेश लाखे (२२), उमेश रमेश लाखे (२५), वडील रमेश होनाजी लाखे (५१) आणि आई राधाबाई रमेश लाखे (४४) अशी मृतांची नावे आहेत.
काल रात्री उमेश आणि गोविंद यांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. हा प्रकार आज सकाळी त्यांच्या आई-वडिलांना दोघांनाही कळला, त्यामुळे दोघांनीही राहत्या घरी आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच गावातील लोकांनी याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.
