मुंबई पालघर जिल्ह्यातील विक्रमगड रोडवरील भुरकुडपाडा बसस्थानकाजवळ अज्ञात कारने दिलेल्या धडकेत १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. करसोद हडळपाडा येथील रोहित हडळ हा त्याच्या दोन मित्रांसह दुचाकीवरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातात मागे बसलेला जितेश गुहे हा किशोर गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.