‘शोले’ चित्रपटात जेलरची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले कॉमेडियन आणि अभिनेता असरानी यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. गेल्या चार दिवसांपासून ते मुंबईतील आरोग्यनिधी रुग्णालयात दाखल होते. जिथे त्यांनी आज दुपारी ३ वाजता अखेरचा श्वास घेतला. 84 वर्षीय असरानी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आज संध्याकाळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती त्यांच्या व्यवस्थापकाने दिली.
असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले
असरानी यांच्यावर अंतिम संस्कार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय जमले. स्मशानभूमीचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.