नवी मुंबईत पुलाची रेलिंग तोडून कार नदीत पडली, चालकाचा मृत्यू

मुंबई नवी मुंबईत शुक्रवारी रात्री उशिरा एक कार पुलाचे रेलिंग तोडून कासाडी नदीत पडली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून गाडी नदीतून बाहेर काढली. यानंतर जखमी चालकाला तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवी मुंबई पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करत आहे. या घटनेबाबत पोलीस अधिका-यांनी शनिवारी सांगितले की, सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्याजवळील कासाडी नदीवरील पुलावर रिक्षाला धडकल्यानंतर कारचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रेलिंगला धडकून कासाडी नदीत पडली. या घटनेत सकाळी गाडी नदीतून बाहेर काढून चालकाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी चालकाला मृत घोषित केले. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!