रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाच्या तपासात उघड, पाच प्रसिद्ध व्यक्ती अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर!

मुंबई चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात पाच प्रसिद्ध चित्रपटसृष्टीही अंडरवर्ल्डच्या लक्ष्यावर असल्याचे समोर आले आहे. या पाच जणांना खंडणीसाठी धमकावण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे, मात्र यापैकी कोणीही अद्याप पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. यामुळे पोलीस हैराण झाले असले तरी पोलीस याबाबत सतर्क राहून आवश्यक ती कारवाई करत आहेत.

चित्रपट निर्माता रोहितच्या घरावर गोळीबार या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, रविवारी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर 6 राऊंड गोळीबार केला.

या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की, केवळ रोहित शेट्टीच नाही तर बॉलिवूडचे 5 बडे स्टार्स गुंडांचे टार्गेट आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!