पर्यावरण पत्रकारितेवर पत्रकार डॉ. प्रशांत यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार

मुंबई गेली अडीच दशके पर्यावरण रक्षण, जलसंधारण, जैवविविधता आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन व जनजागृती करणारे पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ.प्रशांत रवींद्र सिनकर यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. पर्यावरण पत्रकारितेतील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

पर्यावरण पत्रकारितेच्या माध्यमातून डॉ.सिनकर यांनी निसर्ग संवर्धन, जलव्यवस्थापन, शहरीकरणामुळे निर्माण होणारे पर्यावरणीय धोके, ग्रामीण भागातील पाण्याचे संकट अशा समस्यांना समाजाच्या केंद्रस्थानी आणण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखनामुळे पर्यावरणाच्या प्रश्नांवर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनाही निर्णय प्रक्रियेत पर्यावरणाच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करावा लागला आहे.

डॉ.प्रशांत रवींद्र सिनकर यांच्या या दैदिप्यमान कार्याची दखल घेत सामाजिक संस्था एस. हा सन्मान सिंकर यांना ‘शिक्षा फाऊंडेशन’तर्फे प्रमाणपत्राच्या स्वरूपात देण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या सन्मानाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.डॉ. पर्यावरण रक्षण, जलजागृती आणि निसर्गप्रेमाचा प्रसार यासाठी विविध स्तरांवर सातत्याने कार्य करणाऱ्या सिनकर यांना त्यांच्या कार्याचा हा सन्मान पर्यावरण पत्रकारिता क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक आणि नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे वाटते.

“पर्यावरण पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नाही, तर ती समाज आणि निसर्ग यांच्यातील एक जबाबदार भूमिका आहे. या कार्यासाठी सन्मानित होणे प्रेरणादायी आहे आणि भविष्यात अधिक प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करण्याची ऊर्जा देते.”_ डॉ. प्रशांत सिनकर पर्यावरण अभ्यासक

Leave a Comment

error: Content is protected !!