मुंबई 28 जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.या घटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार रोहित पवार यांच्यानंतर अपघातग्रस्त विमानातील केबिन क्रू मेंबर पिंकी माळी यांच्या वडिलांनीही या अपघातावर संशय व्यक्त केला आहे.
पिंकी माळी बीडीडी चाळ क्रमांक 29, वरळी, मुंबई येथे राहत होती. ती व्हीएसआर कंपनीत फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. या विमान अपघातात पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे आम्ही विमान अपघाताबाबतही शंका उपस्थित करत आहोत, असे त्याचे वडील शिवकुमार माळी यांनी म्हटले आहे.
रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्या संशयानुसार चौकशी करावी. या अपघातात आम्ही आमची मुलगी गमावली आहे. त्यामुळे खरे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्हीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही.