मानखुर्दमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन जण जखमी, सायन रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई – मुंबईतील मानखुर्द परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीएमसीने रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 40 वर्षीय पृथ्वी पाल जसपाल यांचा चेहरा, हात आणि छाती 30 टक्के भाजली आहे. तर 25 वर्षीय राजेश खिचडचा चेहरा, हात आणि पाय 25 टक्के भाजले आहेत. दोघांवर बर्न वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मानखुर्द परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. जनता नगरमधील ३० फूट रोडवरील अल मदिना हॉटेलजवळील चाळीत हा अपघात झाला. सायंकाळी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. स्फोटामुळे चाळीतील एका खोलीच्या छताचा काही भाग खराब झाला आहे. घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी जखमी दोघांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले.

Leave a Comment

error: Content is protected !!