मुंबई गोवंडी परिसरातील टाटा नगर येथील दत्त मंदिराजवळ मित्राची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. देवनार पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री उशिरा किरकोळ वादातून मेहंदी हसन अब्दुल हाजी शेख (39) याने टाटानगर येथील दत्त मंदिरासमोर त्याचा मित्र 52 वर्षीय अरुणकुमार युगलकिशोर गुप्ता उर्फ पप्पू याला बेदम मारहाण केली आणि फरार झाला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच अरुणला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान अरुणचा मृत्यू झाला. यानंतर देवनार पोलिस ठाण्याच्या पथकाने मेहंदीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. पोलीस पथकाने मंगळवारी रात्री उशिरा मेहंदीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.