पनवेल महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त…

नवी मुंबईपनवेल महानगरपालिकेला (PMC) महाराष्ट्र शासनाकडून “माझी वसुंधरा अभियान-ग्रीन सक्सेस स्टोरी अवॉर्ड 2025” प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला. बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई येथे मंगळवारी (१४ ऑक्टोबर) आयोजित कार्यक्रमात राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, उपायुक्त स्वरूप खर्गे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, माळी वसुंधरा सल्लागार युवराज झुरंगे यांनी स्वीकारला. वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण आणि हरित कवच विस्तार यासारख्या शाश्वत पर्यावरणीय उपक्रमांद्वारे शहर स्वच्छ आणि हरित बनवण्यात पीएमसीने गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ही कामगिरी स्थानिक प्रशासनाची पर्यावरणीय बांधिलकी स्पष्टपणे दर्शवते.

यावेळी बोलताना पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा पुरस्कार त्यांच्या सततच्या पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि समाजाच्या सहभागाची ओळख असल्याचे प्रतिक असून भविष्यातही अशा प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!